बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे त्यांच्या वक्तव्यांमुळे तसेच कोणावरुन तरी केलेल्या विधानावरुन चर्चेत येत असतात. यावेळी देखील ते चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी ते त्यांच्या नव्या हेअरस्टाईलच्या लूकमुळे चर्चेत आले आहेत. अभिजित बिचुकले यांच्या जुन्या हेअरस्टाईलमुळे त्यांनी अनेक विधान केल्याचं समोर आलं होतं.
त्यावेळी त्यांनी शाहरुख तसेच सलमान खान या दोघांनी त्यांची हेअरस्टाईल कॉपी केल्याचं त्यांनी म्हटलं होत. बिचुकलेंनी तब्बल 25 वर्षानंतर आपली हेअरस्टाईल बदलली आहे. ते पांढऱ्या फुल हॅंड टीशर्ट, तपकिरी पॅंट आणि गॉगलसह हटके स्टाईलने सपॉट झाले आहेत. त्यांनी त्यांच्या नव्या हेअरस्टाईलवरुन हात फिरवत माध्यमांसोबत संवाद देखील साधला आहे.
बिचुकले म्हणाले की, "गेली 25 वर्ष आपली ती हेअरस्टाईल होती, आणि ती आयकॉनिक हेअर स्टाईल दोन्ही बिग बॉस पाहून संपूर्ण भारताच्या तरुण पिढीच्या लक्षात राहिली. त्याच्यामुळे 25 वर्ष झाल्यामुळे माझे हेअरस्टाईलीस्ट आणि मी विचार करून हा हेअरलूक बनवलेला आहे. याच्यावर मत लोकांनी मांडायची आहेत. आता जाता जाता मी हेच बोलेन की, "अगर मैं ने ये हेअरस्टाईल चेंज की है, तो आगे आगे देखिए होता है क्या..." माझ्या जुन्या हेअरस्टाईलची प्रंचड क्रेझ होती. 2019ला मराठी बिग बॉस केला आणि महाराष्ट्रामध्ये माझी हेअरस्टाईल खुप फेमस झाली. हिंदीमध्ये सलमानबरोबर पण माझी हेअरस्टाईल गाजली. त्यामुळे आात येणाऱ्या काळात माझे चाहते माझं अनुकरण करु शकतात", असंही बिचुकले म्हणाले.