मुंबईतील शिवाजी नगर बैंगनवाडीमध्ये सपा आमदार अबू आझमी आपल्या कार्यकर्त्यांसोबत एका उद्धाटनासाठी गेले होते. मात्र कार्यक्रम झाल्यानंतर अबू आझमी शिवाजीनगरची पाहणी करत असताना तेथील काही जणांनी त्या परिसरात असलेल्या घाणीच्या परिस्थितीची समस्या मांडण्याचा प्रयत्न केला.
मात्र अबू आझमी यांनी योग्य उत्तर न दिल्याने स्थानिक नागरिकांनी अबू आझमी यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिल्याच पाहायला मिळालं. या हाणामारीत स्थानिक नगरसेवकालाही मार दिला गेला आहे. घटनेच्या वेळी पोलीस असल्याने थोडक्यात अबू आझमीही वाचले नाही तर त्यांनाही स्थानिक रहिवाशांचा मार पडला असता. ही घटना सोमवारची असल्याच समोर आलं आहे.