भुसावळ शहरात एका अल्पवयीन मुलीवर बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी 31 वर्षीय संशयित अजय गोडाले यास अटक केली असून बाजारपेठ पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 31 वर्षीय संशयीतास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.
संशयिताने गेल्या दोन वर्षात बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला या प्रकारास कंटाळून अल्पवयीन मुलीने 23 जुलै रोजी रात्री बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अटक केलेल्या संशयीताला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.