Ac Local Trains Will Be Introduced On The Csmt Panvel Harbour Line Marathi 
ताज्या बातम्या

CSMT–Panvel प्रवास आता आरामदायी, ‘या’ तारखेपासून एसी लोकल येतंय हार्बर मार्गावर

AC Local Timetable on Harbour Railway : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 26 जानेवारीपासून हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर नव्या एसी लोकल सुरू होणार आहेत.

Published by : Riddhi Vanne

AC Local Timetable on Harbour Railway : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 26 जानेवारीपासून हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर नव्या एसी लोकल सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल धावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी, वडाळा रोड आणि पनवेलदरम्यान दररोज 14 एसी लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मात्र यासाठी काही नियमित लोकल रद्द केल्या जाणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

याआधी तिकिटांचे जास्त दर आणि कमी प्रतिसादामुळे हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद करण्यात आल्या होत्या. आता नव्या वेळापत्रकानुसार गर्दीच्या काही वेळांमध्ये एसी लोकल धावणार आहेत. दुसरीकडे, पश्चिम रेल्वेवर एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आणखी 12 फेऱ्या वाढवण्यात येत आहेत. यामुळे पश्चिम मार्गावरील एकूण एसी लोकल फेऱ्यांची संख्या 121 वर पोहोचणार आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत या गाड्या धावणार असल्याने रोजच्या प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.

हार्बर मार्गावरील एसी लोकलचे वेळापत्रक

पहाटे 4.15 वाशी-वडाळा रोड

सकाळी 6.17 पनवेल-सीएसएमटी

सकाळी 9.09 पनवेल-सीएसएमटी

दुपारी 12.03 पनवेल-वडाळा रोड

दुपारी 2.31 पनवेल-सीएसएमटी

दुपारी 4.55 वाशी-वहाळा रोड

संध्याकाळी 6.37 पनवेल-सीएसएमटी

सकाळी 5.06 वडाळा रोड-पनवेल

सकाळी 7.40 सीएसएमटी-पनवेल

सकाळी 10.34 सीएसएमटी-पनवेल

दुपारी 1.17 वडाळा रोड-पनवेल

दुपारी 3.54 सीएसएमटी-वाशी

संध्याकाळी 5.30 वडाळा रोडा-पनवेल

रात्री 8 सीएमएमटी-पनवेल

थोडक्यात

  • मुंबई लोकलने प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

  • 26 जानेवारीपासून हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर नव्या एसी लोकल सेवा सुरू होणार आहे.

  • प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

  • मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावण्याचा निर्णय घेतला आहे.

  • प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी, वडाळा रोड आणि पनवेलदरम्यान दररोज 14 एसी लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा