ताज्या बातम्या

St Employees : दिवाळीच्या तोंडावरच एसटी कामगार संघटना आक्रमक; आजपासून आंदोलन

दिवाळीच्या तोंडावरच एसटीच्या अनेक कामगार संघटनांनी मोठा निर्णय घेतला आहे. (ST) एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी वेगवेगळ्या 18 संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • दिवाळीच्या तोंडावरच एसटीच्या कामगार संघटनांचा मोठा निर्णय

  • सोमवारपासून आझाद मैदानावर धरणं आंदोलन

  • 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकीत

दिवाळीच्या तोंडावरच एसटीच्या अनेक कामगार संघटनांनी मोठा निर्णय घेतला आहे. (ST) एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी वेगवेगळ्या 18 संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. उद्या (दि. १३) सोमवारपासून आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू होणार आहे.

यासंदर्भात रविवारी कृती समिती मधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक मुंबईत पार पडली. त्यामध्ये आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला कृती समिती मधील हणमंत ताटे, श्रीरंग बरगे, संदीप शिंदे, हिरेन रेडकर, पांडुरंग वाघमारे, दादाराव डोंगरे, बंडू फड, संतोष गायकवाड, राजेंद्र मोजाड, विनोद गजभिये, अरुण वीरकर, गौतम कांबळे, विश्वनाथ जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. एसटीमधील महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील 16 संघटना व अन्य एक महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनानी सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पासून आंदोलनाची नोटीस दिली आहे. आता हे आंदोलन मुंबई सेंट्रल ऐवजी आझाद मैदानावर होणार आहे.

लवकरच दिवाळी तोंडावर आली असून शाळांना सुट्टी सुरू होणार असून यातून काही मार्ग प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्काळ निघणे गरजेचे आहे. त्यामुळे एक बैठक सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामध्ये थकीत देणी रक्कम हप्ता सुरू करण्यात आला नाही तर धरणे व ठिय्या आंदोलन बेमुदत सुरू राहील असेही कृती समितीच्या बैठकीत ठरले. 2018 पासून महागाई भत्ता फरक देण्यात आला नसून सन 2020 ते 2024या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत असून एकूण कर्मचाऱ्यांना 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम मिळालेली नाहीत.

थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेने मशाल मोर्चा व ठिय्या आंदोलनाची वेगळी नोटीस दिली होती. पण आर्थिक मागण्यांचे स्वरूप सारखेच असल्याने सदरची नोटीस मागे घेण्यात आली असून कृती समितीच्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा