ताज्या बातम्या

भीषण अपघाताचा व्हिडिओ; बसची वाट पाहत थांबलेल्या कुटुंबाला बसनेच उडवले

अपघाताचा हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे, कारण काही सेकंदात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकले असते. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुटुंबातील सदस्य महामार्गाच्या कडेला प्रवासी वाहनाची वाट पाहत उभे असल्याचे दिसत आहे. पुढच्याच क्षणी एक भरधाव सरकारी बस त्यांच्या अंगावरून जाते.

Published by : Siddhi Naringrekar

अपघाताचा हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे, कारण काही सेकंदात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकले असते. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुटुंबातील सदस्य महामार्गाच्या कडेला प्रवासी वाहनाची वाट पाहत उभे असल्याचे दिसत आहे. पुढच्याच क्षणी एक भरधाव सरकारी बस त्यांच्या अंगावरून जाते.

हे सर्व इतक्या वेगाने घडते की लोकांना सावरण्याची संधीही मिळत नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की बसने तरुणाला कसे तुडवले आणि दोन मुले आणि एका महिलेलाही धडक दिली. मात्र या भीषण अपघातानंतरही सर्वजण मृत्यूच्या कचाट्यात गेले आणि सुखरूप परतले.

गोध्रा-वडोदरा महामार्गावर कोठी चौकाजवळ हा भीषण अपघात झाला. जिथे एका अनियंत्रित रोडवेज बसने प्रवासी गाडीची वाट पाहत असलेल्या कुटुंबाला धडक दिली. या अपघाताची संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू