ताज्या बातम्या

Nashik-Pune Highway Accident: नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Accident: नाशिक पुणे महामार्गावर कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Published by : Team Lokshahi

Pune- Nashik Highway Accident: नाशिक पुणे महामार्गावर कार व ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. माल वाहतूक ट्रक कारवर कोसळल्याने कार ट्रकखाली चिरडली गेली. या अपघातात अकोले तालुक्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका लहान चिमुकल्याचा समावेश आहे. मात्र एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी धावपळ करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

नाशिकच्या दिशेनं निघालेल्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करत असताना अचानक हा ट्रक त्या कारवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कंपनीच्या इटीयोस कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), आशा सुनील धारणकर (वय 42), सुनील धारणकर (वय 65 वर्ष) व अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्ष) या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीनं वाचविण्यात यश आलंय. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या परतुर येथील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून, यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, रात्रीचा प्रवास सुरु असतानाच भाविकांच्या क्रुझर आणि ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली. ज्यात, एकूण 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, इतर 6 भाविक देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा