Raigad Accident
Raigad Accident Team Lokshahi
ताज्या बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भीषण अपघात

Published by : Pankaj Prabhakar Rane

भारत गोरेगावकर : रायगड | मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रिक्षा आणि डंपरची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. यानंतर मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातातील मृतांमध्ये तीन महाविद्यालयीन विद्यार्थींनींचा समावेश आहे. या विद्यार्थीनी माणगाव तालुक्यामधील गोरेगाव येथून रिक्षाने खेडमध्ये परिक्षेसाठी गेलेल्या होत्या. मात्र घरी परतत असताना कशेडी घाटात हा भीषण अपघात झाला.

रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यातमधील कशेडी घाटामध्ये सोमवारी रात्री उशीरा भीषण अपघात झाला. तीन महाविद्यालयीन विद्यार्थीनी या रिक्षाने प्रवास करत होत्या. परीक्षा आटोपून त्या घरी परतत असताना हा अपघात झाला. गोरेगाव येथील या मुली होत्या. परिक्षेसाठी त्या खेड येथे गेल्या होत्या. मात्र घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. यामध्ये रिक्षाचालकासह या तिघींचाही दुर्दैवी अंत झाला आहे. वाळूने भरलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक झाल्याने रिक्षा पलटी झाली.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास सव्वा सात वाजता हा अपघात झाला. वाळूने भरलेला डंबर आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. या भीषण धडकेनंतर रिक्षामधील प्रवासी आणि रिक्षा चालक हे वाळूच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. यामध्ये त्यांनी जागीच प्राण गमावले. अपघातानंतर उशीरापर्यंत वाहतूक विस्कळीत होती.

अपघातातील मृतांची नावे

आसिया सिद्दीकी (20 वर्षे)

आलीमा अब्दुल सलाम पोपेरे (23 वर्षे)

नाजमीन मूफीद करबेलकर (22 वर्षे)

अमन उमर बहुर (46 वर्षे)

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...