ताज्या बातम्या

Badlapur Sexual Assault : आरोपी अक्षय शिंदे याचा आत्महत्येचा प्रयत्न

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Published by : Dhanshree Shintre

बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या तसेच सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बदलापूरमधील एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे दृष्कृत्य केलं आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात होता. आता याच प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यानी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ट्रान्झिट रिमांडमध्ये नेत असताना त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून स्वतःवर गोळी झाडल्याचे समजते. अक्षय शिंदे याची प्रकृती गंभीर आहे. आरोपी अक्षय शिंदे याने 3 राऊंड फायर केल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

तळोजा जेलमध्ये बदलापूर पोलीस आरोपीचा ताबा घेण्यासाठी गेले होते. ट्रान्झिट रिमांडसाठी बदलापूर पोलीस आरोपीचा ताबा घेत होते. ताबा घेत असताना आरोपी अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली. बंदूक हिसकावताच त्याने बंदुकीतून तीन राऊंड फायर केले. आरोपीने स्वतःवर आणि पोलिसांवर गोळी झाडली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. स्वतःवर गोळी झाडल्यानंतर अक्षय गंभीर जखमी झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?