कल्याण येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली होती. या सगळ्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणामध्ये आरोपी विशाल गवळीला अटक करण्यात आली. तळोजा कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. अशातच आता या आरोपीने तुरुंगातच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विशाल गवळीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिक्षा भोगणाऱ्या विशाल गवळीने पहाटेच्या सुमारास गळफास लाऊन घेतला आहे. तुरुंग प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवले. त्याचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर कारागृह प्रशासनात एकच गोंधळ उडाला आहे.