Delhi Acid Attack : दिल्लीमध्ये महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिल्लीतील एका 20 वर्षीय तरुणीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. ही घटना अशोक विहार लक्ष्मीबाई कॉलेजच्या बाहेर ही दुर्घटना घडली आहे. एका एकतर्फी प्रेमातून ही घटना समोर आली. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला दिपचंद बंधू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
दिल्लीतील मुकुंदपूर येथे राहणाऱ्या पीडित तरुणीवर जितेंद्र नावाचा 26 वर्षीय तरुण तिच्या लक्ष ठेऊन होता. काहीदिवस तो तिचा पाठलाग करत होता. ती एका खाजगीसं संस्थेत दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी अतिरिक्त वर्गासाठी कॉलेजला जात होती. आरोपी जितेंद्र हा त्याच्या इशान आणि अरमान नावाच्या साथीदारांसोबत मोटारसायकलवरुन आले आणि तिला अडवले. इशानने अरमानला एका बाटला दिली, त्यानंतर त्याने तिच्यावर अॅसिड फेकले. चेहरा झाकण्यासाठी तरुणीने हात वर केले. ज्यामुळे तिच्या दोन्ही हातांना भीषण दुखापत झाली. यानंतर तिघेही घटनास्थळावरुन पळून गेले.
पीडित तरुणीनी गंभीर जखमी झाली. यानंतर तिला तातडीने दिपचंद बंधू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जितेंद्र अनेक महिन्यांपासून महिलेचा पाठलाग करत होता. सुमारे एक महिन्यापूर्वी, महिलेचा आणि जितेंद्रचा कडाक्याचा वाद झाला, त्यानंतर छळ वाढला. त्यामुळे नक्कीच दिल्लीमध्ये महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.