ताज्या बातम्या

Pune News : पुण्यात १५ फेब्रुवारीपासून ‘एचएसआरपी’ नसलेल्या वाहनांवर कारवाई

उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसविण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.

Published by : Varsha Bhasmare

पुणे : उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसविण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. १५ फेब्रुवारीपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनधारकांना मोठा दंड भरावा लागू शकतो. पुणे शहर आणि परिसरात एकूण सुमारे २५ लाख वाहने नोंदणीकृत आहेत. त्यापैकी केवळ १०.७० लाख वाहनधारकांनी एचएसआरपीसाठी नोंदणी केली असून, प्रत्यक्षात ८.६२ लाख वाहनांवर प्लेट बसविण्यात आली आहे. म्हणजेच अजूनही सुमारे १५ लाख वाहने एचएसआरपीशिवाय रस्त्यावर धावत आहेत. ही बाब परिवहन विभागासाठी चिंतेची ठरली आहे.

वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी एचएसआरपी सक्तीची करण्यात आली आहे. या प्लेटमध्ये विशेष कोड आणि होलोग्राम असतो, ज्यामुळे वाहनाची ओळख पटविणे सुलभ होते. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्लेट बसविणे बंधनकारक आहे. मात्र अनेक वाहनधारकांनी अद्यापही या प्रक्रियेला प्रतिसाद दिलेला नाही. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, १५ फेब्रुवारीनंतर अपॉइंटमेंट घेणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच रस्त्यावर तपासणीदरम्यान केवळ एचएसआरपीच नव्हे तर वाहनाचा विमा, पीयूसी (प्रदूषण प्रमाणपत्र) आणि चालकाचा परवाना यांचीही काटेकोर पडताळणी केली जाणार आहे.

वाहनधारकांनी अधिक विलंब न करता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपीसाठी नोंदणी करून प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. अन्यथा मोठा दंड आणि वाहन जप्तीची कारवाईही होऊ शकते.मी दरम्यान, अचानक कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये धावपळ सुरू झाली असून अधिकृत केंद्रांवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबण्याऐवजी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा