Vinod Patil  Team Lokshahi
ताज्या बातम्या

रायगड किल्ल्यावर पिंडदान करणाऱ्यावर कारवाई करावी - विनोद पाटील

मराठा आरक्षणाचे याचिका करता विनोद पाटील यांची मागणी

Published by : shweta walge

सचिन बडे, औरंगाबाद : रायगड किल्ल्यावर पिंडदान करणाऱ्या समाज विघातक वृत्तीचा मी जाहीर निषेध करतो तसेच हे पिंडदान करणाऱ्यावरती कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी मराठा आरक्षणाचे याचिका करता विनोद पाटील यांनी केली आहे.

कोरोना काळामध्ये रायगड किल्ल्यावरती शिवभक्तांना जाण्यासाठी एक पत्र काढून जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली होती. मात्र त्या ठिकाणी पिंडदान झाले याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यावरती निश्चित करून (यांचे कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती नाही) कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच हे प्रकरण उघडकीस आणणारे शिवभक्त यांनी समोर येऊन पुरावे सादर करावे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची उचल बांगडी करावी अशी मागणी मराठा आरक्षणाचे याचिका करता विनोद पाटील यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : साखरपुड्यावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला! ; चिमुरडा गंभीर तर वधूला...

Latest Marathi News Update live : सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला

RBI's Big Decision : ग्रामीण भागातील कर्ज प्रक्रिया सुलभ; RBI कडून मोठा निर्णय

Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला; सखल भागात पाणी साचले, वाहतुकीचा खोळंबा