राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्स (Pune Land Scam) एलएलपी कंपनीने तब्बल १८०४ कोटी रुपये बाजारभाव असलेलीजमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर (Pune Land Scam) आरोप करण्यात आला, या प्रकरणामुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं.या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी म्हटलंय की, आमचं एकच मत आहे की, कुठलाही नेता असो किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती असो, चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
तर रोहित पवार पुढे म्हणाले, चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, पण ती कारवाई करताना कुठेही भेदभाव होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. पण हे सरकार आम्ही जेव्हा काही प्रकरणं पुढे आणतो तेव्हा, मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा व्यक्ती असेल तर त्याबाबत कारवाई होत नाही. पण कुठे मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई होते. आम्ही सिडको प्रकरण पुढे आणले. त्याप्रकरणात सरकारच्या एका विभागाने सांगूनही संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण पुणे जमीन घोटाळा प्रकरणात सुपरफास्ट कारवाई केली जाते. आमचं मत आहे, भेदभाव न करता कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिक रोहित पवारांनी स्पष्ट केली आहे.