dharmendra  Team Lokshahi
ताज्या बातम्या

अभिनेता धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली? सनी देओलचं दिलं स्पष्टीकरण

Published by : Sudhir Kakde

अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता त्यांचा मुलगा अभिनेता सनी देओलने या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे.

अभिनेता बॉबी देओलने वडील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मौन सोडलं असून, त्यांच्याबद्दलचे हे सर्व वृत्त चुकीचे असल्याचं सांगत अभिनेता बॉबी देओलने सांगितलं की वडील धर्मेंद्र हे ठणठणीत आहेत. बॉबीने वडिलांना रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. तसंच ते ठीक असून, घरी आहेत असं सांहितलं. बॉबीने वडील धर्मेंद्र यांच्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. बॉबीचं हे वक्तव्य ऐकून धर्मेंद्रच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल.

गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल

गेल्या मे महिन्यात धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. 'अपने 2' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते जखमी झाले होते. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा