ताज्या बातम्या

Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूर रुग्णालयात दाखल; अभिनेत्रीवर उपचार सुरु, नेमकं कारण काय?

जान्हवीला 'अन्नातून विषबाधा' झाल्यामुळे त्रास होऊ लागल्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Published by : Dhanshree Shintre

अभिनेत्री जान्हवी कपूरला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जान्हवीला 'अन्नातून विषबाधा' झाल्यामुळे त्रास होऊ लागल्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जान्हवीचे वडिल बोनी कपूर यांनी आघाडीच्या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना या बातमीला दुजोरा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला अन्नातून विषबाधा झाल्यामुळे दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जान्हवी चेन्नईत होती आणि मंगळवारी परत येताना विमानतळावर काहीतरी खाल्ल्याचे सूत्राने सांगितले. जान्हवीची प्रकृती स्थिर असून तिला शुक्रवारपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल अशी खात्री कौटुंबिक सूत्रांनी दिली.

काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जान्हवी कपूरनं तिच्या फॅशन स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी जान्हवी तिचा प्रियकर शिखर पहारियाबरोबर लग्नसोहळ्यात हजर होती. या कार्यक्रमातील फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिचे वडील बोनी कपूर, तिचा प्रियकर शिखर पहारिया यांच्यासह अनेक कलाकारांनी तिच्या लूकचं कौतुक केलं होतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा