थोडक्यात
मराठी अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.
अभिनेत्री मेघा धाडे महेश कोठारेंच्या समर्थनार्थ पुढे आली.
तिने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांची बाजू घेतली आहे.
Megha Dhade Supports Mahesh Kothare: मराठी अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी भाजपला दिलेल्या जाहीर पाठींब्यामुळे काही जणांनी त्यांना साथ दिली तर काहींनी टीका केली. दिवाळीच्या कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी “मी मोदी भक्त आहे आणि मुंबई महापालिकेत कमळच फुलेल,” असं वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना (ठाकरे गट) चे संजय राऊत आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर टीका केली. मात्र आता अभिनेत्री मेघा धाडे महेश कोठारेंच्या समर्थनार्थ पुढे आली असून, तिने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांची बाजू घेतली आहे.
काय लिहिलयं मेधा धाडे पोस्टमध्ये?
"अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उध्दव सेना जॉइन केली होती तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता !, सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती तरी कोणी आक्षेप घेतला नाही !. परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उध्दव सेनेला इंगळ्या डसल्या ! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली ! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली !
हे असे झाले कारण कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले कोणत्या तिकीटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवार, करतोय जो मुंबईकर आधी ट्रॅफिक मध्ये अडकायचा आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उध्दव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली ! आणि हे सत्यात देखील उतरणार आहे.
कॅप्शनमध्ये मेधा धाडे लिहिते की,
महेश सर तुम्ही जे बोललात ते तुमचं मत होतं , जे तुम्ही मनापासून व्यक्त केलं , आम्हा सगळ्यांना तुमच्या मताचा शंभर टक्के आदर आहे . बाकी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा कारण कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना छोडो बेकार की बातो को, हमे तो सच के साथ ही हैना 😊🙏 @maheshkothare