Prajakta Gaikwad Engagement Photos : मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंची दमदार भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड तिच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या आयुष्यातील हा खास क्षण सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. प्राजक्ताचा होणारा नवरा शंभूराज खुटवड हे फुरसुंगी येथील असून, राजकीय कुटुंबाशी संलग्न आहेत. शंभूराज हे केवळ राजकारणातच नव्हे तर कुस्तीच्या मैदानावर पैलवान म्हणून आणि उद्योग क्षेत्रातही सक्रिय आहेत.
हा साखरपुडा अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला आहे. राष्ट्रवादी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही विशेष उपस्थिती लावली. दोघांचा विवाह प्रेमविवाह आहे की अरेंज मॅरेज, याबाबत मात्र अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र त्यांच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ता आणि शंभूराज यांच्या साखरपुड्याचे रोमँटिक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आनंद व्यक्त केला आहे. या सुंदर जोडप्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे.