Raj Kundra  
ताज्या बातम्या

Raj Kundra : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला समन्स

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रावर गंभीर आरोपांमुळे चौकशीची प्रक्रिया सुरू आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला समन्स

राज कुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स

60 कोटींच्या गुंतवणुकीत फसवणूक केल्याचा आरोप

( Raj Kundra ) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रावर गंभीर आरोपांमुळे चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने (EOW) त्यांना 60 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. त्यांना 15 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. याआधी 10 सप्टेंबर रोजी हजेरी लावण्याची वेळ देण्यात आली होती, मात्र त्यांनी वेळेत बदल मागितला होता.

राज कुंद्रावर दाखल झालेल्या तक्रारीनुसार राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी गुंतवणूकदारांचे पैसे व्यवसायासाठी न वापरता वैयक्तिक फायद्यासाठी खर्च केले असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाशी संबंधित तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गुंतवणूकदार दीपक कोठारी यांनी कंपनीत केलेल्या गुंतवणुकीबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान EOWने राज कुंद्रावर लुकआऊट सर्क्युलरही जारी केले आहे. त्यामुळे ते देश सोडून परदेशात जाऊ शकणार नाहीत. त्याचबरोबर या प्रकरणाशी संबंधित नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलच्या (NCLT) एका ऑडिटरला देखील चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे.

2015 ते 2023 या कालावधीत गुंतवणुकीतून आलेल्या पैशांचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार त्यांना विश्वास दिला गेला होता की गुंतवलेली रक्कम परत केली जाईल, मात्र तसे झाले नाही. या संपूर्ण घडामोडींचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक वेगाने सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा