ताज्या बातम्या

Digital Substation In BKC : अत्याधुनिक डिजिटल सबस्टेशनचे BKC मध्ये उद्घाटन; इलेक्ट्रिक वाहनांसाठी फायदेशीर ठरणारी सुविधा

BKC येथे अत्याधुनिक असे 220 KV च्या डिजिटल सबस्टेशनचे उद्घाटन केले.

Published by : Team Lokshahi

अदानी इलेक्ट्रिसिटी हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात कार्यक्षम वीज वितरण नेटवर्क आहे. मुंबई आणि उपनगराच्या 400 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या 3 दशलक्ष ग्राहकांना अदानी इलेक्ट्रिसिटी सेवा पुरवत आहे. आता त्यामध्ये नवे पाऊल टाकत अदानी इलेक्ट्रिसिटीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे अत्याधुनिक असे 220 KV च्या डिजिटल सबस्टेशनचे उद्घाटन केले. हे सबस्टेशन बीकेसी आणि आसपासच्या परिसरातील व्यावसायिक, निवासी आणि पायाभूत प्रकल्पांना खूप उपयुक्त असून, ज्यामुळे मुंबईचा आर्थिक आणि शहरी विस्तार मोठ्या प्रमाणावर होण्यास मदत मिळणार आहे.

अत्याधुनिक सबस्टेशनचे फायदे

हे डिजिटल सबस्टेशन आयईसी - 61850 प्रोसेस बस तंत्रज्ञानाचा वापर करते. ज्यामुळे तांबे केबल्समध्ये ९२ टक्के घट होते. या सुविधेत पर्यावरणपूरक 220 केव्ही 2x125 एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवले आहे. ज्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट ग्रिड क्षमतांनी सुसज्ज असलेले हे सबस्टेशन ट्रान्समिशन लॉसेस कमी करण्यास मदत करते. वाढत्या पायाभूत सुविधा, नवीन इमारती आणि कार्यालयांच्या वाढत्या संख्येमुळे त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांमुळे विजेची मागणी वाढत आहे. भविष्यामध्ये अतिरिक्त वीजपुरवठा सुरक्षित कारण्यासाठी हे सबस्टेशन महत्वाची भूमिका बजावेल, असे मत अदानी समूहाचे प्रवक्त्यांनी मांडले.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी फायदेशीर

अदानी इलेक्ट्रिसिटीचा इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंवा वाहनांच्या निर्मिती किंवा विक्रीमध्ये थेट सहभागी नसली तरी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधांसह इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी पायाभूत सुविधा पुरवण्यात मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. याच गोष्टीला समर्थन देण्यासाठी अदानी कंपनीने युलूसारख्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. त्यांना मुंबईतील बीकेसी येथे उद्घाटन झालेल्या सबस्टेशनसारखे डिजिटल सबस्टेशन फायदेशीर ठरणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा