ताज्या बातम्या

अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी एंटरप्रायझेसने ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्याचा घेतला निर्णय

Published by : Siddhi Naringrekar

अदानी एंटरप्रायझेसने 20,000 कोटी रुपयांचे फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) रद्द केल्याची घोषणा केली आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घोषणा करताना कंपनीने सांगितले की या एफपीओचे सर्व पैसे गुंतवणूकदारांना परत करणार आहेत. अदानी समुहानं नुकताच अदानी एंटरप्राइजेज याचा FPO जारी केला होता. 31 जानेवारीपर्यंत गुंतवणूकधारकांना पैसे गुंतवण्याची संधी दिली होती. पण कंपनीनं एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली, कंपनीमधील सदस्यांच्या हितासाठी एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला.  अदानी समूहाकडून गुंतवणूकधारकांना पैसे परत दिले जाणार आहेत. 

अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे कंपनी अडचणीत असताना अदानी समूहाने हे पाऊल उचलले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या या अहवालात कंपनीवर मोठ्या कर्जाचा उल्लेख करताना टॅक्स हेव्हन्सचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.अदानी एंटरप्रायझेस तब्बल २८ टक्क्यांहून अधिक तर, अदानी पोर्ट्स १९ टक्क्यांहून अधिक गडगडला. मागील पाच सत्रांमध्ये अदानी समूहाने तब्बल ७ लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवल गमावले आहे.

अदानी समूहाने एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, 'कंपनीच्या संचालक मंडळाने, आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या बैठकीत, घटकांच्या हितासाठी, प्रत्येकी 20,000 कोटी रुपयांपर्यंतचे डिबेंचर्स जारी करण्यास मान्यता दिली आहे. पेड-अप आधारावर रु 1 चे दर्शनी मूल्य. इक्विटी शेअर्सच्या FPO पुढे न जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एफपीओ म्हणजे काय? 

आयपीओ बाजारात आणल्यानंतर कंपनीला पुन्हा भांडवलीची गरज भासते. अशावेळी कंपनी पुन्हा आपले शेअर्स बाजारात विक्रीला काढते. आणि याला एफपीओ म्हणजे  फॉलो ऑन पब्लिक ऑफर असं म्हणतात. काही वेळा नव्याने शेअर्स जारी देखील केले जातात. एफपीओ नव्या आणि जुन्या गुंतवणूकदारांसाठी असतात. 

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल