ताज्या बातम्या

Aditi Tatkare | राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर, आदिती तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसकडून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी

Published by : shweta walge

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यातील उमेवारांची पहिली यादी जाहीर झाली ज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा मंत्री अदिती तटकरे यांना संधी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अदिती तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

उमेदवारी मिळाल्या बद्दल अदिती तटकरे यांनी महायुतीच्या नेत्यांचे आभार व्यक्त करत विकास कामांच्या मुद्यांवरती या निवडणूकीला सामोरे जाऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सुलभा खोडके यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं ही उमेदवारी यादी जाहीर केली आहे. भाजप आणि शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीतून अजित पवारच लढणार असल्याचं या यादीतून आता स्पष्ट झालं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा