ताज्या बातम्या

Aditya L1 Launch : 'आदित्य एल1'ने घेतली सूर्याकडे झेप; भारताचे मिशन स्टार्ट

आदित्य एल 1ने सूर्याकडे झेप घेतली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आदित्य एल 1ने सूर्याकडे झेप घेतली आहे. चांद्रयान 3 च्या यशानंतर आता आदित्य एल-1 आज सूर्याकडे झेप घेतली आहे. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. भारताची ही पहिलीच सूर्याची मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत सूर्याचा अभ्यास करणार आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात आले.

 आदित्य एल 1 हे 125 दिवस प्रवास करणार असून त्या 15 लाख किलोमिटरचे अंतर पार करणार आहे.  हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर काढण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु होईल. हे भारताच पहिलं सौर मिशन आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर सगळ्यांच्या नजरा आदित्य एल 1 मिशनकडे लागल्या आहेत. आदित्य यान पाच टप्प्यांमध्ये सूर्याचा प्रवास करणार आहे. 

पाचव्या टप्प्यात हे यान सूर्याचा अभ्यास करण्यास सुरुवात करेल. हा संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आदित्य एल1 मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. ते सूर्याचा अभ्यास करणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा