सध्या महाराष्ट्रामध्ये दिशा सलियन मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा वर आले आहे. दिशाच्या मृत्यूच्या 5 वर्षानंतर दिशाच्या सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी केला आहे. दिशा सालियन मृत्यूचा तपास पुन्हा एकदा करावा अशी नवीन याचिका सतीश सालियन यांनी दाखल केली आहे. याबद्दल वकील नीलेश ओझा यांनी याचिकेबद्दल भाष्य केले आहे.
वकील नीलेश ओझा म्हणाले की, "आदित्य ठाकरे, सुरज पांचोली आणि इतरांच्या विरोधात गॅंगरेप, खून, 376 डी, 302, 120 अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करावेत. कस्टडी घेण्यात यावी. यांची लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी. राशिद खान पठाण यांच्या जनहीत याचिकेसोबत सतिश सालियन यांची याचिका जोडण्यात यावी. याप्रकरणी साल 2024 मध्ये राशिद खान पठाण यांनी लेखी तक्रार दिलेली आहे".
पुढे ते म्हणाले की, "त्यामुळे याप्रकरणी गुन्हेगारांवर तातडीने गुन्हा दाखल करायला पाहिजे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करताना समीर वानखेडेंकडे दिशा सालियन प्रकरणातील काही महत्त्वाचे पुरावे सापडले होते. ते हायकोर्टात सादर करण्याचे आदेश देण्याची मागणीही आम्ही कोर्टाकडे केली आहे. याप्रकरणी याचिकाकर्ता म्हणून आम्हाला काही झालं तर त्यासाठी आदित्य ठाकरे आणि इतर त्याला जबाबदार असतील", असं देखील यावेळी वकील निलेश ओझा यांनी म्हटलं आहे.
नंतर नीलेश ओझा म्हणाले की, "हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. सर्व तपास पूर्ण होऊ द्या. सदर प्रकरणामध्ये जे पोलिस सहभागी होते त्यांना सर्वांतव आधी अटक करा. दरम्यान दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह जिथे पडायला हवा होता तिथे तो नव्हता. तिचे दात तुटलेले होते. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. मात्र अंतिम संस्कारांच्या वेळी तिचा मृतदेह पूर्ण स्वच्छ दिसत होता. याबद्दल नारायण राणे आणि नितेश राणे यांनी वारंवार सांगितले होते". दरम्यान आता या प्रकरणाला कोणते वळण लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.