ताज्या बातम्या

Aditya Thackeray : 'ही तर 'महाझुटी सरकार', जाहीरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केलं नाही'; आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात

उद्धाटनाच्या भाषणात आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरजार तोफ डागली.

Published by : Rashmi Mane

नाशिकमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार शिबीर पार पडत आहे. या शिबिराचे उद्धाटन आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी उद्धाटनाच्या भाषणात आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरजार तोफ डागली. त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुनावले. ही महायुती नव्हे तर 'महाझुटी' सरकार आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, "आपल्याला सभेची सवय, हॉलची नाही. हा शिबिराचा चांगला कार्यक्रम हाती घेतला. मुंबईत असेच एक शिबीर घेतले होते. लहानपासून मी राजकारणात आहे. बोर्डाचे पेपर जवळ असतांना उद्धव ठाकरेंसोबत मी श्रीवर्धनला दौऱ्यात होतो. साधारण 100 दिवसांचा हनिमूनचा काळ असतो. महाझुटी सरकारचे शंभर दिवस झाले. या काळात एकही चांगली योजना आली का?. या सराकरने महिलांसाठी कोणती योजना आणली. तरुण तरुणीसाठी सरकारने काय केलं. लाडकी बहीण 500 वर आणायची तयारी सुरू. भाजप, एकनाथ शिंदे गट, दादांचा गट असेल यांना ठासून आल्यावरसुद्धा एक योजना आणू शकत नाही. याला निर्लज्जपणा म्हणतात. यांचेच कोणीतरी कोर्टात जाईल आणि लाडकी बहीण योजना बंद करतील. हे सरकार निवडणूक आयोगाचे सरकार आहे. पहिल्या शंभर दिवसांत महिलांवर अत्याचार वाढले. शांततेत रेप झाला कुणाला कळला नाही म्हणून सांगणारे आपल्याकडे गृहराज्यमंत्री आहे. गेंड्याची नसेल अशी कातडी या सरकारची आहे. बीडचे फोटो प्रेसने दाखविले तेव्हा मंत्र्यांचा राजीनामा घेतला," असे एक ना अनेक विषय आदित्य ठाकरे यांनी भाषणात मांडले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य