यवतमाळ वाशिमचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे म्हणाले की, आज यवतमाळ येथे फॉर्म भरायला चाललो आहे. यवतमाळमध्ये सभा आहे. प्रचार सुरु आहे. हे सगळं सुरुव असताना महायुतीकडून अजून उमेदवार ठरलेला नाही आहे. भ्रष्ट उमेदवार देणार की कोण नवीन चेहरा येणार हा एक प्रश्न आहे. बंडखोरी आणि गद्दारीमध्ये खूप फरक असतो. महत्वाची गोष्ट हीच आहे की, 40 जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा. कारण चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे. तिथे लोकांनी नाकारलं आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, भाजपाचे देखिल आपण पाहिलं सरकार गेल्या 10 वर्षात केंद्रात असो किंवा इथं काही वर्षांमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती. जी आश्वासनं दिली होती. कालच एप्रिल फूल डे होऊन गेला. जगात काही देशांमध्ये एप्रिल फूल डे साजरा होतो आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो. परिवर्तनाचे वारे सगळीकडे वाहायला लागलेलं आहेत.
आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत आणि जनता आपण पाहाल आमच्यासोबत राहिल. देशात लोकशाही संपत चाललेली आहे. संविधानाला मोठा धोका आहे आणि अशा काळात आम्ही सगळेच एकत्र येऊन जे लोकशाही संपवत आहेत, जे संविधान बदलायला इच्छुक आहेत. त्यांच्याविरोधात लढत आहोत. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.