दिल्लीत लोकसभेचं अधिवेशन यादरम्यान नारायण राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. यादरम्यान भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांचे आपल्याला दोन फोन आल्याचा दावा राणेंनी केला आहे. तर त्यांनी दिशा सालियन प्रकरणावर देखील भाष्य केलं आहे. त्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरेंनी यावर आपण कचऱ्याकडे लक्ष देत नसल्याच म्हटलं आहे.
"16 वर्ष झाली तरी आम्ही त्यांच्या मनातून उतरत नाही "- आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे म्हणाले की, "गेल्या 16 वर्षांपासून मी या कचऱ्याला उत्तर देत नाही. माझं कामच ते आहे की, ह्यांना उत्तर द्यायचं नाही. कारण, यांना पगारचं माझ्यावर टीका करण्याचा मिळतो. आधी ही पाहिलं असेल, माझ्या वडिलांवर, माझ्या कुटुंबावर, माझ्या पक्षावर ते टीका करत असतात. त्यांना आजा जाऊन 16 वर्ष झाली तरी आम्ही त्यांच्या मनातून उतरत नाही. आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल आहे".
"रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशी हवी अशी आम्ही मागणी केली आहे, EOW ची मागणी केली आहे. फक्त विरोधी पक्षनेतेच नाही तर भाजप आणि इतर पक्षाचे नेते देखील ही मागणी करत आहे. कचऱ्यावर आपण लक्ष देत नाही. जाणून बुजून कॉन्ट्रोव्हर्सी करतात जेणेकरून इतर महत्त्वाच्या प्रश्नावरून लक्ष विचलित होतील. 100 दिवस सरकले देखील झालेत पण सरकारने काय केले? वर्तमान लपवण्यासाठी इतिहास काढला जातोय. जेव्हा सरकार अपयशी ठरतो तेव्हा असं मागच्या गोष्टी काढल्या जातात".