Ajit Pawar : गणेशोत्सवासाठी राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन; उपमुख्यमंत्री पवारांचे मोठे पाऊल Ajit Pawar : गणेशोत्सवासाठी राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन; उपमुख्यमंत्री पवारांचे मोठे पाऊल
ताज्या बातम्या

Ajit Pawar : गणेशोत्सवासाठी राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन; उपमुख्यमंत्री पवारांचे मोठे पाऊल

उपमुख्यमंत्री पवारांचे पाऊल: गणेशोत्सवासाठी राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन, आर्थिक दिलासा.

Published by : Riddhi Vanne

महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तांना मोठा दिलासा दिला आहे. नेहमीप्रमाणे महिन्याचा पगार किंवा निवृत्तीवेतन पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला जमा केला जातो. उदाहरणार्थ, ऑगस्ट महिन्याचे वेतन 1 सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होते. मात्र, यंदा गणरायाच्या आगमनाच्या आनंदात कर्मचाऱ्यांच्या घरात आर्थिक टंचाई जाणवू नये म्हणून सरकारने आगाऊ वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून सुरू होत असल्यामुळे, यावेळी 26 ऑगस्ट रोजीच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार तसेच निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन यांची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. वित्त विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (जीआर) जाहीर केला आहे.

राज्य सरकारकडून दर महिन्याला लाखो अधिकारी-कर्मचाऱ्यांना पगार तसेच पेन्शनधारकांना निवृत्तीवेतन देण्यात येते. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या खरेदीसाठी व कौटुंबिक खर्चासाठी या उत्पन्नाला विशेष महत्त्व असते. यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर वेतन लवकर मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत असून, यामुळे पगारधारक आणि निवृत्तीवेतनधारकांना उत्सव आनंदात साजरा करण्यास मदत होईल. महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या या सणाच्या तयारीला कर्मचाऱ्यांच्या घराघरात आता आर्थिक बळ मिळाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Periods Delaying Pills : धक्कादायक! मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या खाणं जीवावर बेतलं; तरुणीचा मृत्यू

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर; 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Latest Marathi News Update live : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन

Mumbai cha Raja 2025 : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन