ताज्या बातम्या

'होय मी श्रद्धाला मारले...', आफताबने पॉलिग्राफी चाचणीत केला गुन्हा कबूल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याने आज आपला गुन्हा मान्य केला आहे. आफताबने पॉलीग्राफी चाचणीत श्रद्धाच्या हत्या केल्याची कबुली दिली आहे. मात्र, आफताबला श्रद्धाची हत्या करण्याचा कोणताही पश्चाताप नाही, अशी माहिती फॉरेन्सिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सुत्रांनी दिली आहे.

माहितीनुसार, पॉलीग्राफी चाचणीदरम्यान आफताबचे वर्तन अगदी सामान्य होते. आफताबने सांगितले की, त्याने पोलिसांना सर्व काही सांगितले आहे. आता तज्ज्ञ आफताबच्या पॉलिग्राफी चाचणीचा अंतिम अहवाल तयार करत आहेत. हा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे. या अहवालामुळे पोलिसांना तपासात मदत होईल, अशी अपेक्षा आहे. आता आफताबची 1 डिसेंबर रोजी नार्को चाचणी होणार आहे. नार्को चाचणीपूर्वी आफताबची प्री-मेडिकल चाचणी घेण्यात आली होती. या पूर्व वैद्यकीय चाचण्या फक्त एफएसएल लॅबमध्ये करण्यात आल्या.

काय आहे श्रध्दा वालकर प्रकरण?

श्रद्धा वालकर आणि तिचा प्रियकर आफताब या दोघांची एका डेटींग अ‍ॅपवर भेट झाली. मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तिथेच त्यांची मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघेही दिल्लीत शिफ्ट झाले आणि लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. परंतु, काही दिवसांमध्येच दोघांमध्ये भांडण सुरु झाली. या दरम्यान आफताब याने १८ मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून हत्या केली व तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून दररोज एक एक तुकडा जंगलात फेकल्याचेही समजते.

तर, पोलिसांच्या माहितीनुसार, श्रद्धाला आफताबसोबत ब्रेकअप करायचा होता. यामुळे आफताबला राग आला आणि त्याने श्रद्धाची हत्या केली. आफताबच्या वागण्याला आणि मारहाणीला श्रद्धा कंटाळली होती. अशा परिस्थितीत तिने 3-4 मे रोजी आफताबपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आफताबला हे मान्य नव्हते आणि त्याने श्रद्धाची हत्या केली. मात्र, याआधी आफताबने चौकशीदरम्यान श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती. आणि रागातून श्रध्दाची हत्या केली, असे सांगितले होते.

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका

Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला

Loksabha Election 2024 : देशभरातील 12 राज्यांतील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, आज आणि उद्या समुद्रकिणारी जाणं टाळावं, धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना