After Ajit Pawar Death Ncp Mlas Appoint Sunetra Pawar On The Post Of Legislative Group Leader In Vidhansabha  
ताज्या बातम्या

Sunetra Pawar : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गट नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक सुरू असून, या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेते म्हणून निवड होणार आहे. त्यानंतर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

Published by : Riddhi Vanne

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक सुरू असून, या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेते म्हणून निवड होणार आहे. त्यानंतर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बारामतीहून पहाटे मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.

दरम्यान, 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे चार सहकाऱ्यांसह निधन झाले होते. उपमुख्यमंत्री आणि अर्थखात्याची जबाबदारी सांभाळणारे अजित पवार यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सध्या त्या राज्यसभेच्या सदस्य आहेत आणि पुढे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निर्णयाचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले असून, सध्याच्या परिस्थितीत हा योग्य पाऊल असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, शरद पवार यांनी या घडामोडींबाबत आपल्याला पूर्वकल्पना नसल्याचे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. राज्यातील दुखवट्याच्या वातावरणात घेतलेला हा निर्णय आता कोणती दिशा दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

  1. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक सुरू

  2. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेते म्हणून निवड होणार

  3. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

  4. बारामतीहून पहाटे मुंबईत दाखल

  5. पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा