ताज्या बातम्या

Sonu Nigam : "कन्नड लोक चांगले आहेत, म्हणूनच..." ; तक्रार दाखल झाल्यानंतर सोनू निगमने पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

वादग्रस्त विधान: सोनू निगमने कन्नड भाषिकांबाबत केलेल्या विधानावरून वाद; सोशल मीडियावर दिली प्रतिक्रिया.

Published by : Team Lokshahi

बॉलिवूडमधील पार्श्वगायक सोनू निगम (Sonu Nigam) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 25-26 एप्रिल रोजी बंगळुरुतील विरोनगर येथील एका महाविद्यालयामध्ये झालेल्या संगीत कार्यक्रमादरम्यान सोनू निगमने वादग्रस्त विधान केले होते. ज्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होऊ झाली. त्या व्हिडिओमध्ये त्याने कन्नड भाषेचा संबंध 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे घडलेल्या घटनेशी जोडला होता. त्यामुळे कन्नड समर्थक संघटनेच्या भावना दुखावल्या. याप्रकरणी सोनू निगमविरुद्ध FIR दाखल नोंदवण्यात आला. याचपार्श्वभूमीवर सोनू निगमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोनू निगमने व्हिडिओमध्ये काय स्पष्टीकरण दिले?

सोनू निगम म्हणतो की, "'कन्नड कन्नड, कन्नड' प्रेमाने म्हणणे आणि धमकी म्हणणे वेगळे आहे. ज्यावेळेस मी गाण गायला सुरुवात केली. त्यानंतर प्रेक्षकांमधील 4-5 मुलींनी धमकवत कन्नड भाषेमध्ये गाण गायला सांगितले. परंतु त्यांना आधी सांगावे लागेल की, तुम्ही आम्हाला धमकावू शकत नाहीत." पुढे व्हिडिओमध्ये सोनू म्हणतो की, "कन्नड भाषिक लोक खूप चांगले आहेत, म्हणूनच त्याचा गैरसमज झाला असावा".

नेमंक प्रकरण काय?

25-26 एप्रिल रोजी बंगळुरुतील विरोनगर येथील एका महाविद्यालयामध्ये झालेल्या संगीत कार्यक्रमादरम्यान सोनू निगमने वादग्रस्त विधान केले होते. या कार्यक्रमात सोनू निगम म्हणाला की, "मला हे आवडले नाही की मी एका मुलासमोर कन्नड गाणी गातोय. जेवढे त्याचे वय पण नसेल त्याच्या आधीपासून मी कन्नडमध्ये गाणी गातोय. पहलगाममध्ये जे घडले त्याचे हेच कारण आहे ना? तू जे करत आहेस, आत्ता जे केलस त्याचे कारण आहे ना? बघ तुझ्या समोर कोण उभा आहे."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा