महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार दिवसात पावसाने हाहाकार माजवला होता. ज्यामुळे संपुर्ण राज्यभरात वाहतूकसेवा पुर्णपणे ठप्प झाल्या तसेच रस्त्यावर पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे सोसायटी आणि घरातही पाणी शिरले तसेच राज्यभरात शाळा कॉलेजना सुट्टी देण्यात आली होती. पावसाने गेल्या काही दिवसात संपुर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले होते. त्यानंतर आज पाऊस मागील काही दिवसांपेक्षा सावरला असून हलक्या वाऱ्यासह सुरु आहे.
दरम्यान महाराष्ट्रानंतर आता पावसाचे वारे उत्तर प्रदेशात सरकल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान उत्तर प्रदेशच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24-48 तासांत आणखी मजबूत होऊ शकते, ज्यामुळे मान्सूनच्या हालचाली तीव्र होतील.
त्यामुळे दक्षिण उत्तर प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत अलर्ट देण्यात आले आहेत. नुकताच उत्तर प्रदेशातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे आता येणाऱ्या पावसाच्या शक्यतेसाठी काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट
यावेळी पाऊस हा दक्षिण उत्तर प्रदेशातील प्रयागराज, बांदा, चित्रकूट आणि कौशांबी या जिल्ह्यांतून दाखल होत, हळूहळू राज्यभरात आपला जोर धरुन ठेवेल. तसेच वाराणसी, गाझीपूर, मऊ, बलिया, देवरिया, गोरखपूर, संत कबीर नगर, बस्ती, कुशीनगर, महाराजगंज, लखीमपूर खेरी, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, गोंडा, बलरामपूर, श्रावस्ती, सहारनपूर, आझमगढ, बिजनौर, बार्ठी, प्रतापगड, सोनभद्र, मिर्झापूर, चंदौली, जौनपूर,भदोही, बस्ती, बिजनौर, मुरादाबाद, रामपूर, बरेली, पिलीभीत, शाहजहानपूर, एस.एस. अयोध्या, आंबेडकर नगर, सहारनपूर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पडण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञांनी दर्शवली आहे.