ताज्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. विजय शिवतारे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय यांनी दीडतास वेळ दिला. त्यांचं म्हणणं असं आहे की युतीधर्म आहे आणि तो युतीधर्म आपल्याला पाळायला हवा. अशा प्रकारचं संकेत त्यांनी आम्हाला दिलं. परंतु मी अगदी त्यांना सांगितले की, आता एवढ्या सगळ्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या एवढी उत्सुकता आहे की 40 - 41 वर्षानंतर या पवारांना विशेषता अजित पवार यांना तर अजिबात कुठच्याही प्रकारचा विरोध करण्याची कुणाचीही हिंमत नाही आणि म्हणून सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता झाली आहे त्यांची. ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे आणि म्हणून मला उभं राहणं गरजेचं आहे असं मी त्यांना समजावलं.

गणितं सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असही सांगितले आहे परंतु हे जरी खरं असलं तरीही आणि मी हे पण सांगितले आहे की, अजित पवार निवडून येणार नाहीत. मी जरी नसलो ना तरीही अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे. आपण जरा फेरविचार करावा. ही लढाई पवार विरुद्ध कॉमन जनता अशी आहे. मी त्यांना सांगितले की 2 - 4 दिवस मी सर्वांशी चर्चा करतो. वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरवू. मी आपल्या शब्दाबाहेर नाही. पण त्याच्याबरोबर जनतेचा शब्दही तितकाच महत्वाचा आहे म्हणून मी 2 दिवसांनंतर पुण्याला जाणार आहे त्याच्यानंतर ठरवू काय होईल ते.

माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे तर एवढा घाबरतो कशाला. अजित दादांनी माझा आवाका काढला होता. विजय शिवतारे लोकांचा प्रतिनिधी आहे. लोकांच्या ज्या भूमिका आहेत ज्या मी ऐकलेल्या आहेत. त्या मी आपल्याला बोलतो आहे. ही अपप्रवृत्ती संपवली पाहिजे. असे विजय शिवतारे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, 'अशा विधानांना पाठिंबा...'

Gopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन

Mumbai : I Phone-17 साठी ग्राहकांची मारामारी, बीकेसीच्या स्टोअर बाहेर रांगाच- रांगा

रोज सकाळी नाश्त्याला कडधान्य चाट खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या