भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.
या घडामोडीनंतर पाकिस्तानचा शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर घसरला. मात्र सर्वात मोठा प्रभाव दिसला तो सोन्याच्या दरांवर. सोन्याच्या दरात (Gold Rate ) मोठी वाढ झाली. बुधवारी राजधानी दिल्लीतील बाजारात 10 ग्रॅम 99.9% शुद्ध सोन्याचा भाव 1,00,770 रुपये इतका नोंदवण्यात आला. मंगळवारी हा दर 99,750 रुपये होता. म्हणजेच एका दिवसात 1,000 रुपयांची वाढ झाली. 99.5% शुद्धतेच्या सोन्याचा भाव देखील 1.5 रुपयांनी वाढून 1,00,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
देशांतर्गत अस्थिरतेमुळे भारतीय बाजारात सोन्याला मागणी वाढली असली, तरी जागतिक पातळीवर मात्र सोन्याच्या किमतीत थोडीशी नरमाई दिसून आली. सध्याच्या परिस्थितीत सोन्याच्या किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.