रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे डिसेंबर 2024 रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर पदावरून म्हणून निवृत्त झाले. हा सहा वर्षे सेवा केल्यानंतर शक्तिकांत दास यांनी निवृत्ती घेतली. मात्र आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.
शक्तिकांत दास हे तमिळनाडू केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी असून, पंतप्रधानांच्या कार्यकाळापर्यंत किंवा नव्याने आदेश जारी होईपर्यंत ते या पदावर असतील. शक्तिकांत दास यांनी ४२ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतील कारकीर्दीत प्रामुख्याने अर्थ, कर, गुंतवणूक तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या समितीने दास यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.
भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी पी.के.मिश्रा हे 2019 सालापासून पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्यासोबतीला शक्तिकांत दासही काम करतील. आता प्रधान सचिव या नात्याने ते पंतप्रधानांना प्रमुख आर्थिक धोरणात्मक सल्ला देण्याची भूमिका बजावतील.