ताज्या बातम्या

Rupali Thombre : चक्क गुडघ्यावर बसत रुपाली ठोंबरेंनी धरले अजित पवारांचे पाय

रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांचे पाय धरले: काश्मीरमधील थरारक अनुभव आणि महाराष्ट्रात सुखरूप परतल्याचा आनंद

Published by : Prachi Nate

ज्यावेळेस पहलगामध्ये दहशदवादी हल्ला झाला त्यादरम्यान रुपाली ढोबरे पाटील या आपल्या कुटुंबा सोबत कश्मीर ला फिरायला गेल्या होत्या. त्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यात आलं. त्यावेळेस रुपाली ठोंबरे देखील पुणे विमानतळावर दाखल झाल्या आणि सहकुटुंब सुखरुप राज्यात परतल्या. यादरम्यान सुषमा अंधारे यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं होत.

ज्यावेळी त्या काश्मीरमध्ये अडकल्या होत्या त्यावेळेस अजित पवारांनी फोन करत रुपाली ठोंबरेंना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे काश्मीरमधून सुख राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील अजित पवारांच्या पुणे दौऱ्यावेळी गुडघ्यावर बसत अजित पवारांना नतमस्तक झाल्या. ज्यावेळी त्या महाराष्ट्रात परतल्या त्यावेळीस माध्यमांसोबत बोलताना त्या म्हणाल्या की, "भारतात येताना महाराष्ट्रातील लोकं सोबत घेऊन आलो. त्यांची सोय करण्यात यश मिळालं यात समाधान आहे. पण हा थरार कधीच विसरू शकणार नाही. आयुष्याची काय किंमत असते हे लेकरांसोबत अनुभवलं आहे".

ज्यावेळी पहलगाममध्ये दहशदवादी हल्ला झाला त्यावेळेस रुपाली ठोंबरेंसह अनेक लोक हे त्या संकटात सापडले होते. त्यावेळेस त्यांनी व्हिडीओ करत सरकराला विनंती केली होती की, "हल्ल्यावर तुम्हाला जी कारवाई करायची आहे. ती करा पण पर्यटकांना त्यांच्या घरी सुखरुप पोहचवण्याची तयारी करा. अनेक लहान मुले आमच्यासोबत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलून आणि मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून विमानाची सोय करून द्या, अशी विनंती केली आहे. इथे परिस्थिती बिकट आहे. कोणीही सेफ नाहीत". अशी विनंती त्यांनी सरकारकडे केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा