ताज्या बातम्या

Air India : टेकऑफनंतर विमान अचानक 900 फूट खाली, पुढे काय घडलं?

एअरइंडियाच्या विमानाने टेकऑफ केल्यानंतर विमानातील काही तांत्रिक बिघाडामुळे हे विमान तब्बल 900 फूट खाली आले.

Published by : Team Lokshahi

12 जून रोजी झालेल्या अहमदाबाद येथील एअरइंडियाच्या विमान अपघातानंतर आता अजुन एका विमान अपघाताची बातमी समोर येत आहे. या विमानाने टेकऑफ केल्यानंतर विमानातील काही तांत्रिक बिघाडामुळे हे विमान तब्बल 900 फूट खाली आले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची DGCA ने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

एअर इंडियाच्या AI-187, बोइंग 777 या विमानाने दिल्लीहून व्हिएन्नाला जाण्यासाठी इंदिरा गांधी इंटरनॅशनल एयरपोर्ट वरून आकाशाकडे झेप घेतली. मात्र हे विमान आकाशात झेपावल्यानंतर काही मिनिटांनी विमानातील तांत्रिक बिघाडामुळे खाली येऊ लागले. या प्रकाराने विमानामधील प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान कंट्रोल रूममधून विमानाच्या पायलटशी संपर्क साधला जात होता. या काळात पाउलटला ‘GPWS डोंट सिंक' आणि ‘स्टॉल वॉर्निंग' अशा सूचना त्याला कॉकपिटमध्ये मिळाल्या. यामुळे पायलटला विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समजले.

विमान आपल्या निर्धारित उंचीच्या तब्बल 900 फूट खाली आले होते. आता 12 जूनच्या विमान अपघाताची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती वाटत असतानाच पायलटने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत विमानावर नियंत्रण मिळवले आणि विमानाला त्याच्या निर्धारित उंचीपर्यत आणले. त्यांनतर पायलटने 9 तासांचा प्रवास करून सर्व प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना व्हिएन्नाला सुरक्षितपणे आणले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

विमानाने टेकऑफ केल्यांनतर विमान टर्ब्युलन्समुळे अडकले होते. त्यामुळे विमानातील स्टिक शेकर अलार्म वाजू लागल्यामुळे प्रवाशांच्या भीतीमध्ये आणखी भर पडली. मात्र पायलटच्या अथक प्रयत्नामुळे विमानाचा अपघात होण्यापासून वाचला. याप्रकरणी DGCAने तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही पायलटना विमान उड्डाण करण्यास बंदी केली आहे. दरम्यान विमान तपासणीसाठी नवीन क्रूसह टोरंटोला रवाना करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा