अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा सध्या याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपुर्वी तमन्ना आणि विजय या दोघांनीही एकामेकांचे सोशल मीडियावर फोटो काढून टाकले होते. ब्रेकअपनंतर दोघेही लंडनमधील होळी पार्टीमध्ये स्पॉट झाले होते. या सर्व चर्चा सुरु असताना विजय वर्माने एक विधान केले आहे.
एका मुलाखतीमध्ये विजय वर्माने आपल्या रिलेशनशिपबद्दलचे मौन सोडले. विजयने त्याच्या नात्याची तुलना आईस्क्रीमसोबत केली. विजय वर्मा म्हणाला की, "रिलेशनशिपचा आस्वाद एखाद्या आईस्क्रीमप्रमाणे घ्या.. म्हणजे नेहमी आनंदी रहाल. आईस्क्रीममध्ये तुम्हाला कोणताही फ्लेवर मिळतो तो घ्या आणि पुढे चला.." असे विधान विजय वर्माने केले आहे.
2023 मध्ये नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये विजय आणि तमन्ना पहिल्यांदा एकत्र दिसले. त्यामुळे दोघेही एकामेकांना डेट करत असल्याची अफवा पसरली होती. 'लस्ट स्टोरीज २' या वेब सीरिजपासून यांच्या अफेरच्या चर्चा अधिक रंगू लागल्या होत्या. काही दिवसांनंतर दोघांनीही एकामेकांना डेट करत असल्याची कबूली माध्यमांना दिली होती. ब्रेकअप होण्याच्या आधी ते दोघं लग्न करणार असल्याची अफवा पसरली होती.