Raj Thackeray : राज ठाकरेंची सभा, आंदोलनानंतर काय भूमिका मांडणार?, याकडे सर्वांचे लक्ष  Raj Thackeray : राज ठाकरेंची सभा, आंदोलनानंतर काय भूमिका मांडणार?, याकडे सर्वांचे लक्ष
ताज्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंची सभा, आंदोलनानंतर काय भूमिका मांडणार?, याकडे सर्वांचे लक्ष

राज ठाकरेंची सभा: हिंदी सक्तीविरोधात मनसेची भूमिका काय असेल, याकडे लक्ष

Published by : Riddhi Vanne

Raj Thackeray's Meeting on July 18 : राज्यात शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीविरोधात वातावरण चांगलंच तापलेलं असताना मनसे पक्षासोबतच इतर संघटनांनी पहिलीपासून हिंदी नको, ही ठाम भूमिका घेतली होती. 8 जुलै रोजी मिरा-भाईंदर येथे शक्तीप्रदर्शन केलं. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे मिरा रोडला 18 जुलैला एक सभा घेणार आहेत.

5 जुलै रोजी मुंबईत 'विजयी मेळाव्याचं' आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे दोघंही एकत्र मंचावर दिसले. त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, हिंदीप्रेमी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देताना, मनसेने 8 जुलै रोजी मिरा-भाईंदर येथे शक्तीप्रदर्शन केलं. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आता 18 जुलैला मिरा रोड येथे राज ठाकरे एक सभा घेणार आहेत. ही सभा ‘आभार प्रदर्शन’ असली तरी, त्यात राज ठाकरे काय बोलणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीत, काही दिवसांपूर्वी मराठी न बोलणाऱ्या मिठाई विक्रेत्यास मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमधील अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. मनसेने हा मोर्चा भाजप समर्थित असून, तो मराठी जनतेला चिडवण्यासाठी काढल्याचा आरोप केला होता. याचविरोधात मनसेने 8 जुलै रोजी भव्य मोर्चा काढला आणि त्यात प्रचंड गर्दी उसळली. आता त्याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे 18 जुलै रोजी काय भूमिका मांडतात, हे पाहणं राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 : लालबागच्या राजाच्या दर्शनाला जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवार; एका कृतीनं वेधलं लक्ष

Veteran Actor Bal Karve Passes Away : सिनेविश्वात शोककळा! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, ‘गुंड्याभाऊ’ पडद्याआड

Donald Trump vs PM Modi : भारतीय बाजारपेठेवर अमेरिकेचा दबाव; अटी न मानल्यास गंभीर परिणाम

Latest Marathi News Update live : बाळ कर्वे यांचे निधन; वयाच्या ९५ व्या वर्षी मुंबईत झाले निधन