शिंदे-फडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचला जात आहे. आज तुकाराम बीज असल्याने भागवत धर्मातील तुकाराम महाराजांच्या चरणी दंडवत घालून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात फडणवीसांनी केली आहे.
शेतपीक नुकसानीसाठी आता ठराविक निकषाने मदत देण्यात येईल. १ नोव्हेंबरपासून नवे दर लागू करण्यात आले. नैसर्गित आपत्तीनंतर पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई-पंचनामा केला जाईल. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानासाठी शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या दुप्पट दराने मदत दिली. ७ हजार ९३ रुपये निधी देण्यात आला.