इराण आणि इस्त्राईल यांच्यात सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. इराणने त्यांच्या सरकारी माध्यमातून थेट अमेरिकेला इशारा दिला आहे. "सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार." या विधानामुळे तणावात आणखी भर पडली असून अमेरिका आणि तिचे सहयोगी देश याविषयी काय भूमिका घेतात हे पाहणे उचित ठरेल.
दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच दिलेल्या एका प्रेस रिलीजमध्ये ट्रम्प यांनी सांगितले होते की, "मला नोबल शांतता पुरस्कार मिळायला हवा, कारण मी उदारमतवादी आणि शांततेच्या मार्गावर चालणारा नेता आहे." मात्र आता उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीत ट्रम्प आक्रमक धोरण स्वीकारणार की मध्यस्थीची भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे, जागतिक विश्लेषक युद्धाचा धोका व्यक्त करत असून, या संघर्षाचा परिणाम केवळ पश्चिम आशियापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जगावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेलाच्या किमतीपासून ते आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंत अनेक क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो. सध्या या सगळ्या घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित झाले आहे. संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांकडूनही संभाव्य मध्यस्थीची शक्यता वर्तवली जात आहे.