Muslims Agitation Against Nupur Sharma, Navin Jindal  Team Lokshahi
ताज्या बातम्या

मुस्लिम समाजाची देशभरात निदर्शनं; नुपूर शर्मा, नवीन जिंदालविरोधात आक्रमक

सोलापुरात हजारोच्या संख्येनं आज मुस्लिम समाजाचे लोक एकत्र आले आणि त्यांनी निदर्शनं केली.

Published by : Sudhir Kakde

मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा, जिंदाल यांच्याविरोधात आता मुस्लिम समाज आक्रमक झाला असून, देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी यावरुन निदर्शनं करण्यात आली आहेत. राज्यातील सोलापूर, जिल्ह्यात एमआयएम पक्षाच्या नेतृत्वाखाली मुस्लिमांनी मोर्चा काढला असून दुसरीकडे दिल्लीत सुद्धा निदर्शनं करण्यात येत आहेत. शुक्रवारची नमाज अदा करण्यात आल्यानंतर मुस्लिम समाजाचे लोक एकत्र आले असून, त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे.

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जगभरातून या वक्तव्याचा निषेध केला जातोय. आखाती देशांनी थेट भारताला माफी मागण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे भारताला माफी सुद्धा मागावी लागली. त्यानंतर भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करत त्यांची भाजपच्या मूळ सदस्य पदावरुनच हकालपट्टी केली आहे. मात्र त्यानंतर देखील आता मुस्लिम समाजाने एकत्र येत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा