ताज्या बातम्या

Agnipath Scheme Protest : 'अग्निपथ'विरोधात जाळपोळ, आंदोलन, दगडफेक

भावी सैनिकांचा 'अग्निपथ'ला कडाडून विरोध

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : लष्कर, नौदल आणि वायूदलात सैनिक भरतीसाठी केंद्र सरकारने मंगळवारी अग्निपथ योजना (Agnipath Scheme) जाहीर केली आहे. मात्र, या योजनेला देशातील युवकांनी विरोध दर्शविला आहे. तर काही ठिकाणी या विरोधाला हिंसक वळण लागले आहे. अग्निपथविरोधी आंदोलनात (Agnipath Scheme Protest) सर्वाधिक फटका रेल्वेला बसला. मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत एकूण 12 रेल्वेगाड्यांना आगी लावण्यात आल्या.

सैन्यभरतीची अग्निपथ योजना जाहीर करण्यात आल्यानंतर देशाच्या अनेक भागात हिंसक आंदोलनं केली जात आहेत. या आंदोलनाची धग संपूर्ण देशात पसरत आहे. या आंदोलनात 12 रेल्वेगाड्यांना आग लावण्यातस आली आहे. तर, अग्निपथविरोधी आंदोलनात आक्रमक तरुण थेट रेल्वे रुळांवर जाऊन बसले होते. त्यामुळं गेल्या तीन दिवसांत 200 रेल्वेगाड्या पूर्णपणे रद्द कराव्या लागल्या तर 100 रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात आज सिकंदराबादेत एक तर काल बिहारमध्ये एक ठार असे दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

केंद्राच्या अग्निपथविरोधी आंदोलनात तेलंगणामधल्या सिकंदराबादमध्ये जाळपोळ आणि हिंसाचार झाला. जवळपास पाच हजार तरुण अचानक तोडफोड करत रेल्वे स्टेशनमध्ये घुसले. त्यातले पन्नासहून अधिक रेल्वेगाड्यांमध्ये गेले. व त्यांनी रेल्वे पेटवली. आंदोलनकांनी चार ते पाच रेल्वेगाड्यांचे इंजिन पेटवून दिले. शिवाय दोन ते तीन बोगींना आगी लावल्या. या हिंसाचारामध्ये एकाचा मृत्यूही झाला असून 15 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. निदर्शक रेल्वे रुळांवर धरणे धरुन बसल्यानं कित्येक तास रेल्वे वाहतूक ठप्प होती.

दरम्यान, सैनिक भरतीच्या अग्निपथ योजनेप्रमाणे भरती झाल्यानंतर चार वर्षांनी सेवा संपणार आहे. त्यानंतर या युवकांचं भवितव्य काय असेल, याबाबत अनिश्चितता आहे. त्यावरून युवक संतप्त झाले असून यावर सरकार काहीच बोलायला तयार नाही. आणि भरतीची वयोमर्यादा साडेसतरा ते 21 केली होती. ती पहिल्या वर्षासाठी 23 पर्यंत वाढवली आहे. पण त्याने युवकांच्या भविष्याचा प्रश्न सुटणार नसल्याने आता सात राज्यांमध्ये संतप्त युवकांकडून जाळपोळ, दगडफेक होत आहे. मात्र, गैरसमाजामुळे युवक आंदोलन करत आहेत, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा