अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी झालेल्या एअर इंडियांच्या भीषण अपघातात विमानातील 241 प्रवाशांसाह ते विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर पडलं, तेथील विद्यार्थी डॉक्टर्स मिळून आतापर्यंत 270 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानं संपूर्ण देश हादरून गेला आहे. विमानात 230 प्रवासी, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर प्रवास करत होते. मात्र अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेताच काही सेकंदात हे विमान नजीकच्या इमारतीवर कोसळलं. यात विमानातील एक प्रवासी सुदैवाने बचावला असून बाकीचे सर्व 241 जण मृत्यूमुखी पडले. दरम्यान, यातील एक क्रू मेंबर असणारे कैज खान यांनाही इतर सदस्यांसह श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्या सर्व क्रू मेंबर्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर आरआयपी असे लिहिले आहे.
सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओचा स्वतः कैज खान यांनी खुलासा केला असून आपण जीवंत असल्याचे प्रमाण जगाला दिले आहे. त्या दुर्घटनेवेळी आपण दिल्लीत एका ट्रेनिंगनिमित्त उपस्थित असल्याचे कैजनं म्हटलं आहे. तर दुपारी 1 वाजता जेवणावेळी आपल्याला गुजरातमधील ती दुर्घटना बातमी समल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोशल मीडियावरील तो व्हायरल व्हिडिओ फेक असल्याचही त्यांनी म्हटलं आहे. कैज खान हे मुंबईतील दहिसर येथील रहिवासी असून ते सध्या घरी सुखरूप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा