एअर इंडियाच्या फ्लाईट एआय Air India's Flight AI 171 विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच नियंत्रण सुटून ते बी.जे. मेडिकल कॉलेजजवळील रहिवासी परिसरात कोसळले. या भीषण दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, मात्र विश्वेशकुमार रमेश मात्र या मृत्यूच्या छायेतून अक्षरशः जीव वाचवून बाहेर पडले. मूळचे भारतीय असलेले मात्र सध्या ब्रिटिश नागरिकत्व असलेले रमेश विश्वास कुमार आणि त्यांचे भाऊ अजय हे दोघे भारतामधील आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले होते. मात्र ते लंडनला परत जात असताना विमान अपघातामध्ये रमेश यांचे भाऊ अजय हे मृत्युमुखी पडले. तर रमेश विश्वास कुमार हे आश्चर्यकारकरित्या या अपघतात बचावले. मंगळवारी रात्री त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला.
एअर इंडियाच्या फ्लाईट एआय 171 मधील एकमेव जिवंत प्रवासी, रमेश विश्वास कुमार जळत्या विमानातून बाहेर पडले आणि अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते, त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना मंगळवारी रात्री उशिरा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी दिली. रमेश विश्वासकुमार दवाखान्यात ऍडमिट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
डॉ. जोशी म्हणाले की, रुग्णालयाने त्यांना केंद्रशासित प्रदेश दीव येथील कुटुंबाच्या घरी नेण्यासाठी कुटुंबाला मदत केली होती आणि एअरलाइन्स ने विश्वास आणि त्यांच्या कुटुंबासाठी हॉटेल खोल्या देऊ केल्या होत्या, परंतु कुटुंबाने सांगितले होते की त्यांनी स्वतःची राहण्याची व्यवस्था केली आहे.दरम्यान, विश्वासचा धाकटा भाऊ अजय, जो ११-जे सीटवर होता, त्याच्या मृतदेहाची डीएनए विश्लेषणाद्वारे चाचणी झाली आहे . विश्वासला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर काही तासांतच अजयचा मृतदेह बुधवारी पहाटे २.१० वाजता कुटुंबाला सोपवण्यात आला. अजयच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंब दीव येथील त्यांच्या घरी परतले. विश्वासला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, रमेश विश्वासकुमार याने जड अंतःकरणाने आपल्या भावाच्या देहाला खांदा दिला आणि अत्यंत दुःखद भावनेने त्याचे अंतिमसंस्कार केले.