राजस्थानमधील चुरु जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान अचानक काही तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. अचानक झालेल्या या घटनेने त्या परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर तात्काळ बचावकार्य आणि अग्निशामक दलाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. या विमानात दोन वैमानिक होते. त्या दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला
राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड शहराजवळ भानुदा गावामध्ये आज दुपारच्या सुमारास भारतीय हवाईदलाचे जग्वार लढाऊ विमान अचानक कोसळले. तेथील स्थानिकांना जोरदार आवाज ऐकू आल्यावर आणि धुराचे लोट दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. जग्वार लढाऊ विमान हे वायूसेना विभाग जमिनीवरून हल्ला करण्यासाठी किंवा शोध मोहिमांसाठी याचा वापर करते. या सैन्याच्या विमानाला अपघात झाल्याची अधिकृत माहिती चुरुचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनी दिली असून घटनास्थळी दोन मृतदेह सापडले आहेत. आता ते दोन मृतदेह कोणाचे आहेत याचा तपास चालू आहे.
विमान ज्याठिकाणी कोसळले तिथे मोठा आवाज झाला आणि भयंकर स्फोट सह धुराचे लोट दिसू लागले. त्यामुळे भानुदा गावात आणि आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण आहे. स्थानिकांनी मोठ्या संख्येनं अपघातस्थळाकडे धाव घेतली. असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न आहेत.
हेही वाचा