ताज्या बातम्या

Air India Flight Accident : अहमदाबाद विमान अपघात; राजकीय नेत्यांच्या संवेदना आणि प्रतिक्रिया

अहमदाबाद विमान अपघात: एअर इंडिया विमान दुर्घटनाग्रस्त, राजकीय नेत्यांच्या संवेदना व्यक्त.

Published by : Riddhi Vanne

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं असू हे विमान टेकऑफ करताना ही दुर्घटना घडली आहे. आज दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी विमानाचं उड्डाण झालं आणि टेकऑफनंतर 10 मिनिटातच विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे. अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात हा दुर्दैवी विमान अपघात झाला आहे. यादरम्यान आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यानंतर आता राजकिय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Droupadi Murmu यांनी ट्विट टाकत आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघाताबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले आहे. ही एक हृदयद्रावक आपत्ती आहे. माझ्या भावना आणि प्रार्थना पीडितांसोबत आहेत. या अवर्णनीय दुःखाच्या वेळी राष्ट्र त्यांच्यासोबत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी PM MODI यांनी आपल्या प्रतिक्रिया ट्विटद्वारे सांगितल्या आहेत.

अहमदाबादमधील दुर्घटनेने आपल्याला धक्का दिला आहे आणि दुःखी केले आहे. हे हृदयद्रावक आहे जे शब्दांत सांगता येत नाही. या दुःखद घटनेत, माझ्या संवेदना या घटनेने प्रभावित झालेल्या प्रत्येकासोबत आहेत. बाधितांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल Bhupendra Patel यांनी आपल्या प्रतिक्रिया ट्विटद्वारे सांगितल्या आहेत.

अहमदाबादमधील एअर इंडिया प्रवासी विमान दुर्घटनेने मी व्यथित झालो आहे. दुर्घटनेनंतर तात्काळ आपत्कालीन व्यवस्थापन आणि मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अधिकाऱ्यांना वारंवार भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडितांच्या उपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या घटनेबाबत केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी श्री अमितभाई शहा यांच्याशीही माझा संपर्क झाला आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fandvis यांनी आपल्या प्रतिक्रिया ट्विटद्वारे सांगितल्या आहेत.

अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाच्या प्रवाशांच्या विमानातील घटनेबद्दल जाणून दुःख आणि धक्का बसला. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना 🙏

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit shaha यांनी ट्विट टाकत आपल्या मनातले दु:ख सांगितले आहे.

अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघाताचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आपत्ती प्रतिसाद दलांना तातडीने अपघातस्थळी पाठवण्यात आले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी आणि अहमदाबादचे पोलिस आयुक्त यांच्याशी बोललो.

केंद्रिय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह Rajnath Singh यांनी ट्वीटद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अहमदाबादमधील दुःखद विमान अपघाताच्या बातमीने खूप दुःख झाले आहे. माझ्या भावना आणि प्रार्थना प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अदित्य योगीनाथ Yogi Adityanath यांनी ट्वीटद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गुजरात के अहमदाबाद में विमान झाले हादसा अत्यंत दुःखद आणि हृदय विदारक आहे. सर्व पालक आणि संचालक के परिजनांचे प्रति माझे संवेदना करतात.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते शरद पवार यांनी Sharad Pawar यांनी ट्वीटद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे. अपघातग्रस्त जखमी प्रवाशांवर उपचार करणाऱ्या व घटनास्थळी मदतकार्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांना बळ मिळो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते

Chhagan Bhujbal : "मिळालेलं आरक्षण नको आहे का?" छगन भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल!

Uddhav Thackeray On PM Modi : "मोदींच्या मनात पाप असलं तरी मी..." उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

Nikhil Bane : "Finally माझ्या आयुष्यात ती आली..." म्हणत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेने केली पोस्ट शेअर