ताज्या बातम्या

Air India plane crash : अहमदाबाद अपघातानंतर मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेलं एअर इंडियाचं विमान माघारी, महत्त्वाच कारण समोर

अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत.अशातच आता मुंबईतून एअर इंडियाचं विमान माघारी वळवण्यात आलं आहे.

Published by : Prachi Nate

12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. काल लंडनला जाणार एअर इंडियाच्या विमानाचा भयानक असा अपघात झाला. हा विमान अपघात विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळला. यादरम्यान अनेक व्हिडिओ आतापर्यंत समोर आल्या आहेत. यावेळी 200 च्या वर जीवीतहानी झाली असून अनेक नवीन अपडेट या घटनेची येत आहे. या अपघातामुळे संपुर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून संपुर्ण देश हादरलं आहे. अशातचं एअर इंडियाच्या विमानांबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. आज पहाटे मुंबईतून टेकऑफ घेतलेलं एक विमान माघारी फिरवण्यात आलं आहे. यामगचं एक मोठ कारण समोर आलं आहे.

काल झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. अशातच आता मुंबईतून एअर इंडियाचं विमान माघारी वळवण्यात आलं आहे. नुकतचं इस्रायलने इराणवर हल्ला सुरु केला आहे, यामुळे पश्चिम आशियाई प्रदेशात तणावग्रस्त वातावरण आहे. इस्रायलने शुक्रवारी इराणच्या राजधानीवर हल्ला केला, ज्यामुळे तेहरानमधील तणाव वाढला आणि इराणने खबरदारी म्हणून आपली हवाई हद्द बंद केली. यामुळे भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीयांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

याचपार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एअर इंडियाने काही विमानांचे मार्ग बदलले असून काही विमान माघारी वळवली आहेत. यामध्या 16 विमानांना दुसऱ्या मार्गावरून वळवली आहेत. त्याचसोबत, " इस्रायल आणि इराणच्या तणावग्रस्त वातावरणानंतर इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता, सर्व भारतीयांना आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात, दूतावासाच्या सोशल मीडिया खात्यांचे अनुसरण करावे आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे," असे दूतावासाने 'एक्स'वरील पोस्टमध्ये सांगितले आहे.

एअर इंडियाच्या विमानांची यादी खालीलप्रमाणे-

AI130 – लंडन-मुंबई – व्हियेनाकडे वळवले

AI102 – न्यूयॉर्क-दिल्ली – शारजाहकडे वळवले

AI116 – न्यूयॉर्क-मुंबई – जेद्दाहकडे वळवले

AI2018 – लंडन हीथ्रो-दिल्ली – मुंबईकडे वळवले

AI129 – मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईकडे परत

AI119 – मुंबई-न्यूयॉर्क – मुंबईकडे परत

AI103 – दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीकडे परत

AI106 – नेवार्क-दिल्ली – दिल्लीकडे परत

AI188 – व्हँकुव्हर-दिल्ली – जेद्दाहकडे वळवले

AI101 – दिल्ली-न्यूयॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानकडे वळवले

AI126 – शिकागो-दिल्ली – जेद्दाहकडे वळवले

AI132 – लंडन हीथ्रो-बंगळूरु – शारजाकडे वळवले

AI2016 – लंडन हीथ्रो-दिल्ली – व्हियेनाकडे वळवले

AI104 – वॉशिंग्टन-दिल्ली – व्हियेनाकडे वळवले

AI190 – टोरॉंटो -दिल्ली – फ्रँकफर्टकडे वळवले

AI189 – दिल्ली-टोरॉंटो – दिल्लीकडे परत

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते