अहमदाबाद येथे गुरुवारी दुपारी झालेल्या एअर इंडियांच्या भीषण अपघातात विमानातील 241 प्रवाशांसाह ते विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर पडलं, तेथील विद्यार्थी डॉक्टर्स मिळून आतापर्यंत 270 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानं संपूर्ण देश हादरून गेला आहे. विमानात 230 प्रवासी, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर प्रवास करत होते. मात्र अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेताच काही सेकंदात हे विमान नजीकच्या इमारतीवर कोसळलं.
यात विमानातील एक प्रवासी सुदैवाने बचावला असून बाकीचे सर्व 241 जण मृत्यूमुखी पडले. याच अपघाताच्या पार्शवभूमीवर एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतला असून यातून प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी पत्रकारांशी बोलताना एअर इंडियाच्या अहमदाबाद मधील अपघाताबद्दल मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची माफी मागितली. जे कुटुंबीय मृत्युमुखी पडलेली आहे त्यांच्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. "ही एक अत्यंत कठीण परिस्थिती आहे जिथे मृतांच्या कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत". अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याच पार्शवभूमीवर एअरइंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
एअरइंडियाची आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे 15 टक्क्यांनी कमी करणार असून ही अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार आहे. ही कपात जुलैच्या मध्यापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती अध्यक्ष इन चंद्रशेखर यांनी दिली. त्याचबरोबर सर्व विमानांची सुरक्षा यंत्रणा त्याच बरोबर आणि तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. एअर इंडिया त्यांच्या बोईंग 777 विमानांची देखील योग्य ती तपासणी करण्यात येणार आहे. कंपनीने म्हटले की ज्या प्रवाशांच्या विमान उडान बद्दल काहीही तक्रार आढळल्यास त्यांना पर्यायी विमानाने पाठवले जाईल किंवा त्यांना पूर्ण रिफंड दिला जाईल.