ताज्या बातम्या

Air India च्या विमानाला पक्षी धडकला आणि...; तब्बल 8 उड्डाणे रद्द, नेमकं काय घडलं ?

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द: एअर इंडियाची प्रवाशांना सूचना

Published by : Shamal Sawant

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाची अनेक विमाने रद्द झाल्याची माहिती समोर आली. अशातच आता पुणे येथून उड्डाण करणारे एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. याबद्दलची माहिती एअर इंडियाने दिली आहे. पुण्यातून दिल्लीला जाणाऱ्या AI2470 या विमानाला पक्षी धडकल्याने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, एअर इंडियाने शुक्रवारी 8 उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये 4 आंतरराष्ट्रीय आणि ४ देशांतर्गत उड्डाणे समाविष्ट आहेत. विमान कंपनीने उड्डाणे रद्द करण्यासाठी देखभाल आणि ऑपरेशनल कारणे दिली आहेत. एअर इंडियाने या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. गुरुवारी, एअर इंडियाने सांगितले की ते 21 जून ते 15 जुलै 2025 पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे आठवड्यातून कमी करेल आणि तीन मार्गांवरील सेवा तात्पुरती स्थगित करेल.

एअर इंडियाने या उड्डाणे रद्द केली

दुबई ते चेन्नई - AI906

दिल्ली ते मेलबर्न - AI308

मेलबर्न ते दिल्ली - AI309

दुबई ते हैदराबाद - AI2204

पुणे ते दिल्ली - AI874

अहमदाबाद ते दिल्ली-AI456

हैदराबाद ते मुंबई-AI-2872

चेन्नई ते मुंबई-AI571

एअरलाइनने प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत

एअरलाइनने प्रवाशांना त्यांच्या वेबसाइटवर त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा किंवा अपडेटसाठी कस्टमर केअर नंबरवर कॉल करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'आमच्या विमानांची वाढती तपासणी, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि खराब हवामान यामुळे आम्हाला काही अडथळे येण्याची शक्यता आहे, ज्याबद्दल प्रवाशांना योग्यरित्या माहिती दिली जाईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या